जोरदार शक्ति प्रदर्शना सह : महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल.

1 min read

Maharashtra Assembly Election 2024: Mahayuti Candidate Sunil Tingre Files Nomination for Vadgaon Sheri Constituency

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज प्रचंड जनसमुदाया सह जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे.

धानोरी गाव येथील ग्रामदेवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आमदार सुनील टिंगरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित दुचाकी रॅलीला सुरुवात झाली.धानोरी, विश्रांतवाडी, नागपूर चाळ मार्गे येरवडा येथे या रॅलीचा समारोप झाला.

रॅली दरम्यान या भागातील विविध समाजा तर्फे आमदार सुनिल टिंगरे यांचे स्वागत करून जाहीर पाठींबा देखील देण्यात आला. रॅली मध्ये सर्व वायोगटातील व जवळपास सर्वच जाती धर्मातील मंडळी मोठ्या जल्लोषात सामील झाले होते, या वरून आमदार सुनील टिंगरे यांची लोकप्रियता आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या प्रती नागरिक समाधानी असल्याचे जाणवले.

या वेळी महायुतीचे पुणे शहरातील प्रमूख नेते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, नेहा शिंदे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, माजी नगरसेवक सतीश मस्के, सुनीता गलांडे, संदीप जराड़, उषा कलमकर, मीनल सरोदे, पांडुरंग खेसे, बंडू खांदवे, चंद्रकांत टिंगरे, शशी अण्णा टिंगरे, सुनील जाधव, शंकर संगम, प्रकाश भालेराव, प्रदीप देशमुख, दत्ता सागरे आदी उपस्थित होते.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी टिंगरे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले असून या निवडणुकीत विकास, जनतेचे हित आणि लोकाभिमुख धोरणे हे मुख्य मुद्दे राहणार आहेत. यावेळी महायुतीतर्फे टिंगरे यांच्या प्रचाराची जोरदार मोहीम राबवली जाणार आहे.भाजप, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या महायुतीचे सुनील टिंगरे हे अधिकृत उमेदवार आहेत.

  • Pune businessman ransom threat
  • Bishnoi gang ransom email
  • Rs 15 crore ransom Pune news
  • Pune police Bishnoi gang investigation
  • Business safety in Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours