मावळ आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून सातव्या किर्तन महोत्सवाचे आयोजन! 50,000 भाविकांचा दररोज किर्तनासाठी उत्स्फूर्त सहभाग!
7th Kirtan Festival Organized Under MLA Sunil Shelke’s Leadership!


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
मावळ (प्रतिनिधी): संत महंतांच्या पावन परंपरेला उजाळा देत मावळ तालुक्यातील श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्यावतीने आयोजित सातव्या कीर्तन महोत्सवाला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कामशेत येथील माळरानावर दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात होणाऱ्या या महोत्सवात हजारो भक्तांची गर्दी लोटत आहे.
या भक्तिमय कार्यक्रमाची सुरुवात 1 जानेवारी 2025 रोजी झाली असून, पहिल्या दिवशीच ह. भ. प. अंकुर महाराज साखरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. या दिवशी 50,000 हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावत श्री विठ्ठल नामस्मरणाचा आनंद घेतला.
कार्यक्रमात भाविकांसाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे:
- दुपारी 3 ते 4: हरिपाठ
- सायंकाळी 4 ते 6: श्री विठ्ठल नामजप
- सायंकाळी 6 ते रात्री 8: हरिकीर्तन
- रात्री 8.30 नंतर: महाप्रसाद भंडारा

दुसऱ्या दिवशी ह. भ. प. जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन पार पडले, आणि या कार्यक्रमाला राज्याच्या बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी उपस्थिती लावून कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याने मंडप व बैठक व्यवस्था वाढवण्यात आली.
आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता ह. भ. प. शिवा महाराज बावस्कर यांची कीर्तन सेवा होणार आहे. पुढील दोन दिवसांचे प्रमुख कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:
- 4 जानेवारी: ह. भ. प. अमृत श्रम स्वामी महाराज जोशी बाबा यांचे किर्तन
- 5 जानेवारी: सकाळी 10 वाजता, ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे काल्याचे कीर्तन
संपूर्ण महोत्सवात एक भक्तिमय वातावरण तयार झाले असून, टाळकरी, मृदंग वादक, गायनाचार्य, वादनाचार्य यांची टीम व्यासपीठावर सतत भक्तीरस निर्माण करत आहे.
मावळ तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्त्यांमधून महिला, पुरुष, आणि तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. या महोत्सवाने मावळच्या संस्कृतीला एक वेगळा आयाम मिळवून दिला आहे.

श्री विठ्ठल परिवार मावळचे संस्थापक आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी आवाहन केले आहे की, “तमाम नागरिकांनी, माता-भगिनींनी आणि तरुणाईने या कीर्तन महोत्सवात सहभागी होऊन ज्ञानामृत श्रवणाचा लाभ घ्यावा.”


Highlights:
मावळ तालुक्यात कीर्तन महोत्सवाने भक्तिमय वातावरण तयार!
Devotional Ambience Created by Kirtan Festival in Mawal!
50,000 भाविकांचा दररोज किर्तनासाठी उत्स्फूर्त सहभाग!
Over 50,000 Devotees Participate Daily in the Kirtan Festival!
महिला, पुरुष, तरुणाईचा भक्तिभाव: कीर्तन महोत्सवाला जनतेचा भव्य प्रतिसाद!
Massive Turnout of Men, Women, and Youth at Kirtan Festival!
मावळ आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून सातव्या किर्तन महोत्सवाचे आयोजन!
7th Kirtan Festival Organized Under MLA Sunil Shelke’s Leadership!
मावळमध्ये ज्ञानामृताचा महोत्सव: कीर्तन आणि महाप्रसादाचा आनंद!
Spiritual Bliss in Mawal: Kirtan and Community Feast Draw Thousands!
The 7th annual Kirtan Festival organized by Shri Vitthal Parivar Mawal has drawn an overwhelming response, with over 50,000 devotees attending daily. Hosted at Kamseth, the event features soulful kirtans, Haripath sessions, and a grand community feast. Prominent speakers like MLA Sunil Shelke and Minister Aditi Tatkare graced the occasion, emphasizing the festival’s significance in promoting spirituality and unity. The event continues until January 5, with notable kirtankars like Shiv Maharaj Bavaskar and Indori Maharaj delivering captivating sessions. This festival remains a hallmark of devotion and cultural pride for Mawal and beyond.
- Shri Vitthal Parivar Kirtan Festival Mawal
- Mawal MLA Sunil Shelke Kirtan Event
- Devotional Kirtan Festival Maharashtra 2025
- Kirtan Festival Daily Program in Mawal
- Indori Maharaj Kirtan Schedule Mawal
- Shri Vitthal Parivar Kamseth Kirtan Highlights
+ There are no comments
Add yours