पत्रकार मुकेश चंद्रकार यांची हत्या – धाडसी पत्रकारितेचा इतिहास लिहिणारा पत्रकार हरवला
Fearless journalist exposing corruption brutally murdered – Chhattisgarh shaken


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लहानपणी घर चालवण्यासाठी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या आणि संघर्षाच्या जोरावर “बस्तर जंक्शन” युट्यूब चॅनेलसाठी 1.5 लाख सबस्क्रायबर्स मिळवणाऱ्या मुकेश यांनी भ्रष्टाचार उघड करणारी पत्रकारिता केली. परंतु, याच धाडसी वृत्तांकनामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
संघर्षमय सुरुवात:
2005 मध्ये सलवा जुडूममुळे विस्थापित झालेल्या चंद्रकार कुटुंबाने रिफ्यूजी कॅम्पमध्ये आयुष्य सुरू केले. बालपणी गॅरेजमध्ये काम करत त्यांनी घराला हातभार लावला. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि मोठ्या भावाच्या सोबतीने पत्रकारितेची सुरुवात केली.
बस्तर जंक्शनचा आवाज:
“राष्ट्रीय मीडिया बस्तरच्या समस्या योग्य प्रकारे मांडत नाही,” हे ओळखून त्यांनी स्वतःचे “बस्तर जंक्शन” सुरू केले. येथील लोकांचे प्रश्न जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी मोबाईलवर संपादन करत चॅनेल सुरू केले आणि आपल्या मेहनतीने मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवले.
भ्रष्टाचार उघड करणाऱ्या स्टोरीज:
गेल्या काही वर्षांत त्यांनी रस्ते बांधकामातील मोठा गैरव्यवहार उघड केला. 90% पेमेंट आधीच झालेल्या अपूर्ण रस्त्याच्या प्रकरणावर त्यांनी आवाज उठवला होता. याशिवाय त्यांनी अनेक संवेदनशील विषयांवर निडरपणे बातम्या केल्या, ज्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी दबाव टाकला गेला.

हत्येचा उलगडा:
1 जानेवारी 2025 रोजी बेपत्ता झालेल्या मुकेश यांचा मृतदेह 3 जानेवारीला ठेकेदार सुरेश चंद्रकार यांच्या मालकीच्या परिसरातील सेप्टिक टाकीत सापडला. पोलिस तपासात हे उघडकीस आले की, त्यांच्या हत्या पूर्वनियोजित पद्धतीने झाली. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी सुरेश चंद्रकार फरार आहे.
तीन आरोपी अटकेत, चौथा फरार
या प्रकरणात चार आरोपींची नावे समोर आली आहेत – रितेश चंद्राकर, दिनेश चंद्राकर, सुरेश चंद्राकर (बांधकाम कंत्राटदार) आणि महेंद्र रामटेके. त्यापैकी रितेश, दिनेश आणि महेंद्र यांना अटक करण्यात आली असून सुरेश अद्याप फरार आहे.
हत्येचा क्रम आणि पुरावे नष्ट करण्याचा कट
रितेशने आपल्या साथीदारांसोबत मिळून लोखंडी रॉडने मुकेशची हत्या केली. मृतदेह सेप्टिक टाकीत टाकून, टाकीवर नवीन स्लॅब टाकण्याचा कट रचला.

विशेष तपास पथक (SIT) स्थापन
राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणातील आरोपी सुरेश चंद्राकर यांनी मागील वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता, अशी माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
प्रेस असोसिएशनचा तीव्र निषेध
प्रेस असोसिएशन आणि एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

Higlights:
पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी प्रेस काउन्सिलची छत्तीसगड सरकारकडे अहवालाची मागणी!
Press Council Asks Chhattisgarh Government for a Detailed Report on Journalist’s Murder!
मुकेश चंद्राकर: सत्यासाठी झगडणाऱ्या पत्रकाराचा दुर्दैवी अंत!
Mukesh Chandrakar: A Journalist Who Fought for Truth Meets a Tragic End!
प्रेस असोसिएशन व संपादक गिल्डकडून पत्रकाराच्या हत्येचा तीव्र निषेध!
Press Association and Editors Guild Strongly Condemn Journalist’s Murder!
‘बस्तर जंक्शन’ चा आवाज कायमचा थांबला – मुकेश चंद्रकार यांचा हत्याकांड उघडकीस!
(Voice of ‘Bastar Junction’ silenced forever – Mukesh Chandrakar murder case unfolds!)
‘सलवा जुडूम’ ते ‘बस्तर जंक्शन’ – धाडसी पत्रकारितेचा इतिहास लिहिणारा पत्रकार गमावला!
(From ‘Salwa Judum’ to ‘Bastar Junction’ – Journalist who wrote history lost!)
Mukesh Chandrakar, a fearless journalist from Chhattisgarh’s Bastar, was brutally murdered, with his body concealed in a septic tank. Rising from a humble background, Mukesh worked tirelessly to highlight local issues, exposing corruption and creating impactful stories through his YouTube channel “Bastar Junction.” His reporting often faced opposition, but he never compromised on truth. Mukesh’s death has shocked the region, with three arrests made while the main accused remains at large. His legacy as a voice for the voiceless continues to inspire journalists nationwide.
- Bastar journalist murder
- Mukesh Chandrakar story
- Chhattisgarh press freedom
- Salwa Judum controversy
- Bastar Junction journalist
+ There are no comments
Add yours