मावळातील विवेक गुरव, सुनिता सुतार आणि संतोष भिलारे यांचा महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे भारत भूषण पुरस्काराने गौरव!

2 min read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मान!

National Recognition for Vivek Gurav, Sunita Sutar, and Santosh Bhilare from Mawal!

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार” सोहळ्याचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले. ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

या पुरस्कार कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर यासारख्या विविध जिल्ह्यांतील सरपंच, ग्रामसेवक, पत्रकार, उद्योजक, आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

मावळ तालुक्यातील व्याख्याते विवेक गोविंदराव गुरव, आढे ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार, आणि उद्योजक संतोष पांडुरंग भिलारे यांना त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, आणि व्यवसायातील भरीव योगदानासाठी राष्ट्रीय सन्मान देण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र, आणि मेडल प्रदान करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य रेंचलना यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहॉं, प्रेरणा शर्मा भाटिया, डॉ. मनीष गवई, आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

मंचावर उपस्थित मान्यवर:
राष्ट्रीय अध्यक्ष प्रधान सरपंच किशोर मकवान ठाकूर, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, गुलशन खत्री आणि चंदनसिंग यांनीही कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले.

मावळातील विवेक गुरव, सुनिता सुतार, आणि संतोष भिलारे यांचे या राष्ट्रीय सन्मानामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Highlights:

मावळातील विवेक गुरव, सुनिता सुतार आणि संतोष भिलारे यांचा राष्ट्रीय सन्मान!
National Recognition for Vivek Gurav, Sunita Sutar, and Santosh Bhilare from Mawal!

महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे भारत भूषण पुरस्काराने गौरव!
Award Ceremony at Maharashtra Sadan, New Delhi!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा!
Grand Celebration Honoring Ambedkar and Savitribai Phule’s Legacy!

मावळातील तिघांनी राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे नाव कमावले!
Three Mawal Residents Shine on National Stage with Prestigious Awards!

व्याख्याते, सरपंच, आणि उद्योजक यांचा दिल्लीतील सन्मान कार्यक्रमात सहभाग!
Speaker, Sarpanch, and Entrepreneur Honored in Delhi Award Ceremony!

The prestigious Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Bharat Bhushan Award ceremony was held at Maharashtra Sadan, New Delhi, on January 3, 2025, in honor of Ambedkar and Savitribai Phule’s legacy. Among the recipients were Vivek Gurav, a speaker; Sunita Sutar, a sarpanch; and Santosh Bhilare, an entrepreneur from Mawal Taluka, Pune. They were recognized for their remarkable contributions to social, rural, and entrepreneurial fields. The awards, presented by Union Minister Meenakshi Lekhi and other dignitaries, included certificates, medals, and widespread applause for the honorees. This recognition has brought immense pride to Mawal Taluka.

  • Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Bharat Bhushan Award 2025
  • National Awards Maharashtra Sadan Delhi
  • Vivek Gurav, Sunita Sutar, Santosh Bhilare Mawal Achievements
  • Sarpanch Award Ceremony Maharashtra 2025
  • Babasaheb Ambedkar Award Winners Pune
  • National Recognition for Social and Rural Development Leaders

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours