मावळातील ओझर्डे गावाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्र: नवसाला पावणारी जाईबाई देवी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

2 min read

जाईबाई देवी: डोंगरातील आई आणि मावळची श्रद्धास्थळ : निसर्गरम्य ठिकाण: पर्यटनाचा अनोखा अनुभव

A Pilgrimage Like No Other: The Spiritual and Natural Serenity of Jaibai Devi Temple

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील ओझर्डे मावळ येथील कडेकपारीत वसलेले देवस्थान : जाईबाई देवी
वडगांव मावळ: दरवर्षीप्रमाणे यंदाही आज दि ०८ जानेवारी २०२५ रोजी महिन्यात यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला
ओझर्डे गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन जानेवारी महिना आणि नवरात्र उत्सवात दसरा मोठ्या उत्साहाने आनंदमय जल्लोषाचे वातावरण होते.


मावळ तालुक्यात कडे कपारी वसलेले देवस्थान नवसाला पावणारी देवी डोंगरची आई .म्हणून जाईबाई देवी या नावाने ओळखले जाते हजारो भाविक भक्त माता भगिनी देवीच्या दर्शनासाठी जानेवारी महिन्यात व नवरात्र उत्सवात दर्शन घेतात
या यात्रे दिवशी सकाळी श्री ची पूजा आरती देवीला पंचामृत स्नान आणि विशेष देवीला साडी चोळी व नाकात नथ घालून आईचे रूप साजीरे पाहावे असे वाटते त्यानंतर अभिषेक घालण्यात येतो मोठ्या संख्येने महाप्रसाद भंडारा घालून येथील ग्रामस्थ आनंद साजरा करतात

जाईबाई देवी मंदिराचा ऐतिहासिक वारसा
ओझर्डे गावचे देवस्थान काळभैरवनाथ व जाईबाई देवी हे भाऊ बहिणीचे नाते मानले जाते नवरात्र दसरा सण असो व जानेवारीची मोठ्या संख्येने यात्रा गावचा उत्सव असो वर्षातून दोन ते तीन वेळा भाऊ बहिणीची भेट होते जाईबाई देवीचा मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे येथील ग्रामस्थांची भाऊ पाठीराखा काळभैरवनाथ आदिशक्ती देवी म्हणून पुजली जाणारी जाईबाई देवी या ठिकाणी नवसाला पावणारी मानली जाते

निसर्ग आणि अध्यात्मकाचं एकत्रित दर्शन भाविकांची होते मोठ्या संख्येने गर्दी

ओझर्डे मावळ पासून तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर जाईबाई मंदिर कडेकपारी मध्ये वसलेले हे जाईबाई देवीचे मंदिर हे प्राचीन काळापासून आहे तेथील पावसाळ्याच्या काळात निसर्गरम्य धबधबे हिरवळी एक वैशिष्ट्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत धबधबे निसर्गरम्य वातावरणात पाहायला मिळते नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरून अचानक पडलेली नजर ही मन मोहवून टाकते.

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये ओझर्डे गावात डोंगराच्या कडे कपारी मध्ये प्राचीन काळापासून ठाणं मांडून वसलेले देवस्थान म्हणजे आमची जाईबाई देवी जिल्ह्यातून तालुक्यातून दरवर्षीप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तिक माता-भगिनी वर्षातून तीन वेळा उत्सव साठी दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी जमते कोणाची अडचण नवस बोलून पूजा करून जणू भाविक भक्तांच्या देवी नवसाला पावते हे आमच्या गावच्या देवीचे वैशिष्ट्य आहे.
श्रीःबाळासाहेब पारखी ( माः सरपंच ओझर्डे मावळ )”

नवसाला पावणारे देवी जणू आमची जाईबाई देवी हे मावळ तालुक्यातील खूप मोठे वैशिष्ट्य आहे वर्षातून नवरात्र उत्सव दसरा व यात्रा होत असतात प्रचंड लोकांची गर्दी पाहायला मिळते गावठाण पासून मंदिराकडे जाण्यासाठी तीन ते साडेतीन किलोमीटरचा अंतर असल्यामुळे रस्त्याची सुलभ व्यवस्था नाही जलजीवन दिवे खांब सभा मंडप असे कोणत्याही प्रकारची गैरसोय होत आहे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे
श्री तानाजी पडवळ ( काळभैरवनाथ चॅरिटेबल मंच ओझर्डे मावळ)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जानेवारी महिन्या देवीचा उत्सव साजरा करतो प्रचंड लोकसंख्या देवीच्या दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते प्राचीन काळापासून आमचं डोंगराच्या पायथ्याशी कपारीत बसलेले स्थान आमचं जाईबाई देवी मावळ तालुक्यात नावलौकिक व्हावा
श्रीः गोविंद पारखी (माः पोलीस पाटील ओझर्डे मावळ )

प्राचीन काळापासून असलेले देवीचे मंदिर काल्पनिक काळामध्ये जणू लेण्यासारखे वाटते डावीकडे जानुबाई देवीचा ठाण उजवीकडे डोंगर रांगा समोरून उंच डोंगरातून आलेला पावसाळ्या तील धबधबा पावसाळ्यात सभोवताली हिरवे गार बहरलेले निसर्ग रम्य वातावरण असे आमच्या जाईबाईचे रूप पाहून मन हिरावून टाकते.
श्री सोमनाथ भेगडे ( काळभैरवनाथ चॅरिटेबल मंच ओझर्डे )

नवरात्र उत्सव असो गावातील यात्रा असो दरवर्षीप्रमाणे काळभैरवनाथाची पालखी जाईबाई देवीला भेटण्यासाठी बहिण भावाचे रूप दर्शवते प्रचंड असा ग्रामस्थ एकत्र येऊन
देवीची पूजा करून श्री ची पूजा किर्तन भजन महाप्रसादाचा भंडारा मोठ्या भक्ती भावाने उत्सव पार पाडतात. श्रीः शंकर शेळके काळभैरवनाथ मंदिर पुजारी

प्राचीन काळातील मंदिर असून गावठाण पासून मंदिरापर्यंत येणारा साडेतीन तीन किलोमीटरचा रस्त्याचा मार्ग सुधारण्यात यावा काळानुसार भाविक भक्तांची चांगल्या प्रकारे मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते
ग्रामीण भाग जरी असेल तरी सुधारणा ही झालीच पाहिजे विनंती पुर्वक प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे.
श्री राहुल घारे ( माःपोलीस पाटील ओझर्डे मावळ )

मावळ तालुक्यातील नावाजलेली देवी जणू जाईबाई देवी जिल्ह्यातून तालुक्यातून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी येतात यात्रेच्या दिवशी या नवरात्राच्या दसरा दिवशी देवीचा थाट हा सोन्या-चांदीने मडवून तिचा साज रूप अगळं वेगळंच पाहायला मिळतं नवसाला पावणारी देवी मानले जाते प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात सौःस्वातीताई घारे (माः ग्रामपंचायत सदस्या ओझर्डे मावळ )

देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्त माता-भगिनी जाईबाई देवीचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करून आनंदात जातात देवी ही इच्छा पूर्ण करते.
श्रीः गुलाब घारे मा : सरपंच ओझर्डे मावळ

ओझर्डे गावचं गुरुदत्त भजनी भारुड हे महाराष्ट्रभर गाजलेले भारुड असून जाईबाई देवीच्या व काळभैरव भैरवनाथ यांच्या आशीर्वादाने जी कला दिली आहे महाराष्ट्रभर आमचं नाव लौकिक आहे त्यांचे शुभ आशीर्वाद आहेत हे आमच्या मनाचे मोठेपण आहे.
श्रीः छबू ओझरकर (गुरुदत्त प्रसादिक भजनी भारुड ओझर्डे कला मंच )

Highlights:

Sacred Jaibai Temple of Maval: A Center of Faith and Nature’s Beauty

Annual Jaibai Devi Festival: A Grand Celebration of Devotion in Ozarade Village

A Pilgrimage Like No Other: The Spiritual and Natural Serenity of Jaibai Devi Temple

Devotees Flock to Jaibai Temple for Navratri and January Yatra

Preserving Heritage: The Historical and Cultural Significance of Jaibai Temple

The Jaibai Devi Temple, nestled in the picturesque hills of Ozarade, Maval, is a revered spiritual site attracting thousands of devotees annually. Known for its rich historical significance and breathtaking surroundings, the temple celebrates grand festivals during Navratri and January, marked by vibrant rituals and offerings. Devotees believe in Jaibai Devi’s divine blessings and flock to seek her favor. Local authorities have urged for infrastructure improvements, including roads and public amenities, to accommodate the growing number of pilgrims. This sacred site blends faith, tradition, and natural beauty, making it a unique pilgrimage destination.

  • Jaibai Devi Temple Maval
  • Ozarade Temple History
  • Annual Jaibai Devi Yatra
  • Navratri Celebrations Pune District
  • Sacred Pilgrimage Spots in Maharashtra
  • Maval’s Jaibai Temple Tourism
  • Devotional Sites in Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours