अर्धवट आणि जीवघेण्या बीआरटी मार्गामुळे नागरिकांचे हाल!” – माजी आमदार सुनील टिंगरे
Ex-MLA Sunil Tingre’s Demand: “Remove the Incomplete BRT Route Immediately!
१५ दिवसांत तब्बल ५ अपघात: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे
Chandan Nagar Traffic Crisis: Cement Dumper Accident Causes Two-Kilometer Gridlock!”
“Ex-MLA Sunil Tingre Demands Immediate Removal of Dangerous BRT Route!”


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
पुणे | 8 फेब्रुवारी 2025 – चंदननगर, खराडी बायपास येथे बीआरटी मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. सोमवारी रात्री झालेल्या सिमेंट डंपर अपघातामुळे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाढत्या अपघातांमुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
विशेषतः केंद्रीय विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आरोग्य व सुरक्षिततेचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळा सुटल्यानंतर, विशेषतः दुपारी दोन वाजता, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने या रस्त्यावरून प्रवास करत असल्याने त्यांना नेहमीच अपघाताचा धोका असतो.
“अर्धवट आणि जीवघेण्या बीआरटी मार्गामुळे नागरिकांचे हाल!” – माजी आमदार सुनील टिंगरे
यासंदर्भात माजी आमदार सुनील टिंगरे यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन करत सांगितले की, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि सातत्याने होणाऱ्या अपघातांना कारणीभूत ठरणारा अर्धवट बीआरटी मार्ग त्वरित काढावा.
माजी आमदार सुनील टिंगरे यांनी टाइम्स ऑफ पुणे ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले कि, “बीआरटी हटवण्यासाठी मी सातत्याने मागणी करत असून, राज्याच्या विधीमंडळात याबाबत आवाज उठवला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर येरवडा ते सोमनाथ नगर चौकापर्यंतचा बीआरटी मार्ग हटविण्यात आला. मात्र, अद्यापही सोमनाथ नगर चौक ते खराडी दरम्यानचा बीआरटी मार्ग कायम असून, यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.
सोमवारी रात्री या बीआरटी मार्गावर टॅंकर घुसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. परिणामी, सकाळी कामावर निघालेल्या चंदननगर, खराडी, वडगाव शेरी या भागातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले.
बीआरटी मार्गात सतत होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल रोखण्यासाठी ही अर्धवट आणि जीवघेणी बीआरटी लवकरात लवकर हटवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. अन्यथा, या विरोधात जन आंदोलन उभारले जाईल, याची दखल महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी.”

Chandan Nagar Traffic Crisis: Cement Dumper Accident Causes Two-Kilometer Gridlock!””Ex-MLA Sunil Tingre Demands Immediate Removal of Dangerous BRT Route!”
The Chandan Nagar-Kharadi Bypass BRT route has become a major concern due to frequent accidents and severe traffic congestion. Recently, a cement dumper accident led to a two-kilometer-long traffic jam, causing inconvenience to thousands of commuters. The area near Kendriya Vidyalaya has seen multiple accidents in just 15 days, raising safety concerns for students and parents.
Ex-MLA Sunil Tingre has strongly criticized the incomplete BRT route, demanding its immediate removal. He stated that after persistent efforts, the Yervada-Somnath Nagar stretch of BRT was removed, but the Somnath Nagar-Kharadi section remains hazardous. He warned that if the BRT route is not removed soon, a large-scale public agitation will be launched against the authorities.
Local citizens are urging the administration to take urgent safety measures to prevent further accidents and traffic congestion. The growing number of incidents highlights the urgent need to remove the flawed BRT system in Pune.
+ There are no comments
Add yours