कल्याणी नगरच्या बॉलर्स क्लबमध्ये मध्यरात्री ‘कुकरी’ने केक? ! हातात कुकरी आणि कायद्याची पायमल्ली!

1 min read

Lawless Nightlife in Pune? DJ Cuts Cake with Kukri at Ballers Club! VIP Club, Political Shield & Illegal Acts – Punekar Asks Questions!

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डीजे आर्टिस्टचा अनोखा ‘सेलिब्रेशन’; नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

कल्याणी नगर : पुणे शहराचा एकेकाळचा ‘संस्कृती नगरी’ म्हणून लौकिक असलेल्या शहरात सध्या गुन्हेगारी वाढताना दिसते आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत अनेक धडक मोहिमा, तपास कार्य आणि पथकांची रचना केली. परंतु, काही आका ची मर्जी, राजकीय वरदहस्त, प्रभावशाली गुन्हेगारी प्रवृत्ती, का कायद्याची सोयीस्कर पाहिजे तिथे वापर? अशी कोणती करणे आहे जे पोलिसांना पुणे शहर गुन्हेगारी मुक्त करण्या पासून रोखत आहे हे अजून देखील सामान्य पुणेकरांना कळले नाही.

कल्याणी नगर येथील प्रसिद्ध बॉलर्स क्लबमध्ये मध्यरात्री ( निर्धारित वेळेचे उल्लंघन करून ) एका डीजे कलाकाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान कुकरीसारख्या भल्या मोठ्या चाकूने केक कापल्याची घटना घडली. या पार्टीमध्ये सुमारे १५०० ते २००० लोक उपस्थित होते. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पुणेकर विचारतात — जर एखादा सामान्य तरुण रस्त्यावर तलवारी किंवा चाकू घेऊन केक कापतो, तर त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार तात्काळ कारवाई होते, मग बॉलर्स क्लबमधील या धक्कादायक प्रकारावर मात्र प्रशासन गप्प का?

हा काही पहिलाच प्रसंग नाही. याआधीही पुण्यात क्लब, लाउंज, पार्टी ठिकाणी नियम तोडणे, वेळोवेळी हाणामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, ड्रग्सचा वापर, अशा अनेक घटना घडल्या आहेत, मात्र पोलिसांकडून काही पब्स आणि बार ला झुकते माप दिले जाते तर काही विशेष पब्स आणि बार वरती कडक कारवाही केल्याचा गाजावाजा केला जात आल्याचे बोलले जात आहे,


पोलिसांपुढे प्रश्न: पोलिसांची कारवाई या घटनेवर अद्याप झाली नसल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, बॉलर्स क्लबचा मालक एका मोठ्या राजकीय नेत्याच्या जवळचा असून त्यामुळेच ही राजकीय ढाल बनून पोलिसांवर दबाव येतोय काय?

कायद्यासमोर मोठे आव्हान: या घटनेत भारतीय शस्त्र कायदा, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, आणि धोकादायक कृती, निर्धारित वेळेचे उल्लंघन करून पब्स आणि बार मोठ्या जमावाच्या संख्येने चालू ठेवणे अंतर्गत विविध कलमांचा भंग झाला आहे. तरी सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन पुणे पोलिसांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा धाक राखण्यासाठी आणि इतर घटनांना आळा घालण्यासाठी या घटनेवर त्वरित कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा घटनांना उघडपणे व कठोर उत्तर देणं गरजेचं आहे.


Lawless Nightlife in Pune? DJ Cuts Cake with Kukri at Ballers Club! VIP Club, Political Shield & Illegal Acts – Punekar Asks Questions!
In a shocking incident from Kalyani Nagar, Pune, a DJ with an alleged criminal background celebrated his birthday at midnight inside Ballers Club by cutting a cake using a large machete (kukri). The party had over 1500–2000 attendees. Locals are questioning why no strict police action has been taken yet, despite such blatant law violation. Comparisons are being drawn with how common citizens face immediate legal consequences for similar acts. Reports also suggest political backing to the club owner, raising concerns about unequal law enforcement. Pune residents are now demanding action from the city police commissioner.

Ballers Club Pune DJ incident

Machete cake cutting Pune club

Kalyani Nagar party law violation

Pune police action DJ birthday

Pune crime news 2025

Law and order in Pune nightlife

Political influence Pune club

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours