Duty Turns Deadly: Maharashtra Traffic Cop Mithun Dhende Killed by Reckless Truck Driver – Murder Charges Filed, Two Arrested


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
मावळ (प्रतिनिधी): १३ मे २०२५ रोजी, हेड कॉन्स्टेबल मिथुन धेंडे, जे वडगाव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीवर होते, ते वडगाव फाटा येथे वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे एपीआय शीतलकुमार डोईजड हे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, अक्षय पॅलेस, वडगाव कमानीजवळ मुंबई बाजूकडून तळेगाव बाजूकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांना माहिती दिली की, वाहन क्रमांक HR 74 B 3677 चा चालक अतिशय धोकादायकरीत्या वाहन चालवत आहे. सदर वाहन थांबवले नाही, तर तो एखादा मोठा अपघात घडवून निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले.
ही माहिती गांभीर्याने घेऊन शासकीय वाहनाचे चालक श्री. गणपत होले यांनी त्वरित फोनवरून वडगाव नाका येथे वाहतूक नियमनाचे काम करत असलेल्या हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना ही माहिती दिली. हे ठिकाण सुमारे १ किमी अंतरावर होते.
त्याअनुसार, हेड कॉन्स्टेबल धेंडे यांनी संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी, त्यांच्यासोबतच्या ट्रॅफिक वॉर्डन व नागरिकांच्या मदतीने संबंधित वाहनाला मुंबई-चाकण रोडवरील पूजा हॉटेलसमोर थांबवले.
तेव्हा वाहनचालकाने “नीचे आता हूँ” असे बोलले. त्या वेळी वाहन थांबलेले असताना, हेड कॉन्स्टेबल धेंडे हे वाहनाच्या समोर डाव्या बाजूस उभे होते.
अचानक, वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने चालवून, श्री. धेंडे यांना पुढे उभे असताना जाणीवपूर्वक धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि तो चालक चाकणच्या दिशेने पळून गेला.
यानंतर, हेड कॉन्स्टेबल धेंडे यांना त्वरित पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुंडलिक पंढरीनाथ सुतार च्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३ व भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), कलम २८१, मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १७७, १८३, १८४ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
स्थानीय गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ग्रामीण यांचे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिलीमकर यांच्या पथकाने, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने, तांत्रिक तपासाअंती खालील आरोपींना ताब्यात घेतले:
- रोहन इसब खान, वय २४ वर्ष, व्यवसाय: चालक, रा. ग्राम – सिंगार, तहसील – पुनाना, ठाणा – हिंदाना, जिल्हा – मेवात, राज्य – हरियाणा
- उमर दिन मोहम्मद, वय १९ वर्ष, व्यवसाय: क्लिनर, रा. ग्राम – बरसाना, तहसील – छाता, ठाणा – मथुरा, राज्य – उत्तर प्रदेश
सदर आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास श्री. कुमार कदम, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहेत.
Highlights:
On May 13, 2025, Head Constable Mithun Dhende tragically lost his life while performing traffic regulation duties in Vadgaon Maval, Pune. Citizens had alerted the police about a dangerously driven truck (HR 74 B 3677), prompting police to intervene. Dhende and his team successfully halted the truck near Pooja Hotel, but the driver, instead of cooperating, deliberately rammed into Dhende, causing fatal injuries. Dhende was declared dead at Pavana Hospital. Based on the complaint by traffic warden Kundlik Sutar, a case has been registered under BNS 103(1) (attempt to murder) and other sections. The accused – Rohan Khan (driver from Haryana) and Umar Mohammad (cleaner from UP) – have been arrested with assistance from Pimpri-Chinchwad police. The investigation is ongoing under the guidance of Pune Rural police authorities. The incident highlights the growing dangers faced by traffic personnel and raises concerns over untrained and reckless truck drivers on Indian roads.
+ There are no comments
Add yours