Blind Faith in 21st Century: Pune Police Nab Fraudulent Baba From Elite Society! The ‘Gold from Mud’ Baba Busted in Pune’s Koregaon Park – Major Fraud Case Exposed


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
बीड | 18 जुलै 2025 (प्रतिनिधी) – शहरातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात चमत्कारिक दावे करणाऱ्या एका बनवाबाबाचा भांडाफोड झाला असून, कोथरूड येथील एका महिलेची तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘देखने वाला खान बाबा’ नावाच्या व्यक्तीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना एकाच महिलेपुरती मर्यादित नसून, आणखी कित्येक महिलांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पुणे पोलिसांनी व्यक्त केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण : “मातीचं सोनं” एका महिलेने खान बाबाकडे मुलाची नोकरी गेली असून सध्या ती आर्थिक अडचणीत असल्याची कैफियत मांडली. यावर खान बाबाने “तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणची माती घेऊन या, ती माती मी सोनं करीन” असा अविश्वसनीय दावा करत तिला आशा दाखवली. या कथित चमत्कारासाठी त्याने वेगवेगळ्या बळींच्या (बकरी, म्हैस, कोंबडी) पूजा व विधींमध्ये खर्च करण्यासाठी टप्प्याटप्प्याने २.६० लाख रुपये घेतले.
शेवटी एका मडक्यात माती भरून तो मडका पूजेनंतर उघडल्यास ‘सोने’ मिळेल असा दावा केला. मात्र १७ दिवसांच्या विधीनंतर मडक्यात फक्त माती आढळली!

महिलेचा जागरूक निर्णय आणि पोलिसांची तत्पर कारवाई:
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने थेट कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता जाधव यांच्यासमोर तिने हकीगत मांडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खान बाबावर IPC अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
कारवाईत सहभागी अधिकारी:
- पोलीस हवालदार: भोसले
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक: सुनील थोपटे
- गुन्हे शाखा निरीक्षक: संगीता जाधव
- सहाय्यक पोलीस निरीक्षक: वनवे
- पोलीस हवालदार: भोसले
आणखी किती महिलांची फसवणूक?
पोलिसांनी प्राथमिक तपासात हे उघड केलं आहे की, खान बाबा कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू भागात राहून स्वतःला चमत्कारी सिद्ध करत महिलांमध्ये अंधश्रद्धेचा प्रचार करत होता. त्याच्याकडे आधी देखील अनेक महिला अडचणी घेऊन गेल्याची शक्यता असून, पोलिसांनी खान बाबाची चौकशी सुरू केली आहे. आणखी महिलांची फसवणूक झाली आहे का, याचा तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे स्वतः करत आहेत.

Blind Faith in 21st Century: Pune Police Nab Fraudulent Baba From Elite Society! The ‘Gold from Mud’ Baba Busted in Pune’s Koregaon Park – Major Fraud Case Exposed
In a shocking revelation from Pune’s elite Koregaon Park area, a self-proclaimed spiritual healer named “Dekhne Wala Khan Baba” has been arrested for duping a woman of ₹2.6 lakh. The woman approached him during a financial crisis, and the baba promised her gold through a so-called ‘sacred soil’ ritual involving animal sacrifices and daily poojas. When the promised gold never appeared, she filed a complaint. Pune police acted swiftly, arresting the baba and launching a deeper probe into possible multiple victims. Senior officers are continuing the investigation into this modern-age superstition scam.
- खान बाबा फसवणूक
- मातीचं सोनं पूजा फसवणूक
- Pune fake baba arrested
- Koaregaon Park fraud case
- Women black magic scam Pune
- Pune police action on fake baba
- महिला फसवणूक बाबा अटक
- Pune superstition fraud news
+ There are no comments
Add yours