राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार” पत्रकारितेतील ४२ वर्षांच्या योगदानाचा गौरव

1 min read

Raja Mane honoured with ‘Shantidoot’ State Award for 42 years of Journalism

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

Pune | 25 ऑगस्ट – (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या पत्रकारितेत ४ दशकांपेक्षा जास्त काळ सक्रीय राहून लोकशाहीची मशाल प्रज्वलित ठेवणारे संपादक, माध्यमतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांना “शांतीदूत” हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान “शांतीदूत” संस्थेचे संस्थापक व निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात विशेष म्हणजे, सौ. विद्याताई जाधव यांच्या हस्ते सौ. मंदा माने यांचाही सन्मान करून कुटुंबाच्या योगदानालाही दाद देण्यात आली.

या वेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य सचिव महेश कुगावकर, राज्य संघटक अमोल पाटील, पुणे शहर पदाधिकारी पराग डिंगणकर, शांतीदूत परिवाराचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुरेश सपकाळ, सचिव मधुकर चौधरी, तसेच अध्यक्ष शिवाजीनगर शांतीदूत परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी आपल्या भाषणात म्हटले की –
“राजा माने यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीतील चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्याचे काम केले आहे. त्यांची भूमिका पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

42 years of Journalism – Raja Mane awarded with ‘Shantidoot’ State Honour

Renowned journalist, editor, and political analyst Raja Mane was felicitated with the prestigious “Shantidoot” State Award in Pune for his 42 years of contribution to journalism. The award was presented by retired IPS officer Dr. Vitthalrao Jadhav, founder of the “Shantidoot” initiative. Raja Mane, who is also the founder president of the Digital Media Editors Journalists Association Maharashtra and Pratibimb Pratishthan, has been an active voice for social justice and democracy for over four decades.


  • राजा माने पुरस्कार
  • शांतीदूत राज्यस्तरीय पुरस्कार
  • महाराष्ट्र पत्रकारिता सन्मान
  • Digital Media Journalist Award Maharashtra
  • Shantidoot Award 2025 Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours