With Hyderabad Gazette Evidence, Will the Banjara Community Finally Get ST Reservation?


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
Pune | 09 सप्टेंबर – (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळाले आहे. तुळजाभवानी (ऊसतोड) कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींच्या आधारे एस.टी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात आरक्षण मिळवून देण्याची ठोस मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.
काय आहे मागणी ? :
हैदराबाद संस्थानातील महसूल नोंदी, १८८१ ते १९४१ च्या जनगणनेतील आकडेवारी आणि निजाम काळातील सरकारी दस्तऐवजांमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख आढळतो. या आधारावर इतर राज्यांप्रमाणे – जसे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश – बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गात आरक्षण मिळाले आहे. मात्र महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील बंजारा समाज या आरक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सुरेश पवार यांनी निवेदनात स्पष्ट केले की, मराठा समाजाला जसे कुणबी अथवा मराठा-कुणबी आरक्षण मिळाले, तसेच निजाम काळातील नोंदींवर आधारित बंजारा समाजालाही एस.टी प्रवर्गात समाविष्ट करावे.
निवेदनातील मागण्या
- हैदराबाद गॅझेट, निजाम काळातील महसूल नोंदी व जनगणना अहवाल तपासून बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गात समाविष्ट करणे
- महाराष्ट्र सरकारने त्वरित समिती स्थापन करून ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करणे
- इतर राज्यांप्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण लागू करणे
- आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा विचार करून विशेष योजना तयार करणे
- केंद्र व राज्य सरकारने रामरावजी बापू महाराज यांच्या वारंवार मागण्यांना मान्यता द्यावी
https://www.instagram.com/p/DOX5uamkReh
बंजारा समाजाचे वास्तव
महाराष्ट्रातील बंजारा समाज दऱ्या, जंगल, डोंगराळ भागात राहतो. अनेक कुटुंबे ऊसतोडी, वीटभट्ट्या, शेती मजुरी करत उदरनिर्वाह करतात. शिक्षण आणि आरोग्य सेवांपासून वंचित असलेल्या या समाजासाठी आरक्षण हा हक्काचा मुद्दा आहे. हैदराबाद गॅझेटच्या नोंदींनुसार मराठवाड्यातील बंजारा समाज पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नोंदणीकृत होता; परंतु राज्य पुनर्रचनेनंतर त्यांना या प्रवर्गातून वगळण्यात आल्याचा आरोप आहे.
इतर राज्यांतील परिस्थिती
- कर्नाटक – अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश
- तेलंगणा आणि आंध्र प्रदेश – अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश
- या राज्यांतील बंजारा समाजास त्यांच्या बोलीभाषा, विवाहसंबंध, रक्ताचे नाते यावर आधारित एकात्मतेच्या आधारे आरक्षण मिळाले आहे
- महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बंजारा समाज हाच सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या त्या राज्यांशी जोडलेला आहे
समाजाचा इशारा – “आता नाही तर कधीच नाही”
निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, जर राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बंजारा समाजाच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे विनंती केली आहे की, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एस.टी प्रवर्गातील आरक्षण तातडीने लागू करावे, अन्यथा सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
With Hyderabad Gazette Evidence, Will the Banjara Community Finally Get ST Reservation?
The Banjara community in Maharashtra has renewed its demand for inclusion under the Scheduled Tribe (ST) category based on historical evidence from the Hyderabad Gazette and census records from 1881 to 1941. Led by Suresh Pawar, the community has petitioned the state and central governments to form a committee to examine these documents and grant ST reservation, as is already the case in neighboring states like Karnataka, Telangana, and Andhra Pradesh. The community, historically marginalized and economically disadvantaged, has warned of statewide protests if the government fails to act promptly.
- बंजारा समाज एस.टी आरक्षण
- हैदराबाद गॅझेट बंजारा समाज
- अनुसूचित जमाती आरक्षण महाराष्ट्र
- बंजारा आरक्षण लढा २०२५
- ST Reservation for Nomadic Tribes
- Banjara Community Rights Maharashtra
+ There are no comments
Add yours