At just 44, a journey of service comes to an end… What void has Devidas Kaka Rajeshirke left behind?

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7
Pune | २८ सप्टेंबर – (प्रतिनिधी) – अ.नगर जिल्ह्यातील मौजे पेडगांव ता. श्रीगोंदा येथील ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) चे वारस थोर समाजसेवकाच्या जाण्याने शोकाकुल झाला आहे. किल्ल्याच्या वारशाशी निगडीत असलेले आणि माजी सरपंच म्हणून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पैलवान मा. श्री. देविदास (काका) गणपतराव राजेशिर्के (वय ४४) यांचे सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील वाडिया हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
राजेशिर्के घराण्याच्या परंपरेने समाजकार्यात रुजलेले हे व्यक्तिमत्व केवळ आपल्या गावापुरते मर्यादित नव्हते, तर श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यातही त्यांचे दांडगे योगदान होते.
समाजसेवेची अखंड परंपरा :
वडील चेअरमन पैलवान गणपतराव राजेशिर्के यांच्या पावलावर पाऊल ठेवत देविदास काकांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. श्रीगोंदा मार्केट कमेटी, ग्रामपंचायत आणि शेतकरी सोसायटीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. धर्मवीरगड किल्ल्याचे संवर्धन, मंदिरे उभारणी, गणेशोत्सव-नवरात्रोत्सवात सहभाग आणि गोर-गरजूंना आर्थिक मदत – अशा असंख्य उपक्रमांतून त्यांनी समाजाशी घट्ट नाते जोडले.
पैलवान ते अष्टपैलू नेता : देविदास काका हे नाव जसे समाजकारणात गाजले, तसेच त्यांनी कुस्तीच्या आखाड्यातही लौकिक मिळवला. क्रिकेटमध्ये ते अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित होते. खेळाडूवृत्ती आणि लढवय्या स्वभावामुळे विरोधकांनाही त्यांनी आपलेसे केले.
त्यांच्या जाण्याने संपूर्ण पेडगाव आणि श्रीगोंदा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, इतिहास अभ्यासक व पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के, सतिश राजेशिर्के यांचे ते धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा यशराज, मोठा राजेशिर्के परिवार असा मोठा आप्तसमूह आहे.
दशक्रिया विधी:
दशक्रिया विधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी, श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमा नदी तीरावर पार पडेल. यानिमित्त ह.भ.प. विजयाताई पंडित यांचे प्रवचन होणार आहे.
Devidas Kaka Rajeshirke death, Dharmaveergad descendant, Pedgaon Sarpanch, social leader, Shrigonda news, Ahmednagar politics, Rajeshirke family
Devidas Kaka Rajeshirke (44), a descendant of the historic Dharmaveergad fort lineage and former Sarpanch of Pedgaon, passed away on September 22, 2025, while undergoing treatment in Pune. Known for his strong presence in politics, sports, and social service, Rajeshirke carried forward the legacy of his father, Late Chairman Ganpatrao Rajeshirke. He was actively involved in fort conservation, temple building, and community welfare. His untimely demise has left a deep void in Ahmednagar’s political and social circles. The last rites will be performed on October 1, 2025, at Siddhatek, Ahmednagar.
- पुणे मोबाईल चोरी पकड
- पक्या अटक मार्केट यार्ड
- पुणे गुन्हेगारी बातमी
- Pune Mobile Theft News
- Market Yard Police Action
- Notorious thief Pakkya Pune
+ There are no comments
Add yours