पुण्यातील कुख्यात मोबाईल चोर ‘पक्या’ अखेर तुरुंगात – पोलिसांचा धडक सापळा यशस्वी

1 min read

Infamous mobile thief finally behind bars – Pune Police’s smart trap succeeds

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7

Pune | २८ सप्टेंबर – (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांत मार्केट यार्ड परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांत अचानक वाढ झाली होती. व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोबाईल काही सेकंदांत हातोहात गायब होत होते. या मालिकेमागे ‘पक्या’ असल्याची माहिती पोलिसांना गुप्त सूत्रांकडून मिळाली.

मोबाईल चोरीत कुप्रसिद्ध असलेल्या ‘पक्या’ उर्फ प्रकाश देवराम परिहार (वय 28, रा. लोहीया नगर) याला अखेर मार्केट यार्ड पोलिसांनी शिताफीने सापळा रचून जेरबंद केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, पक्या हा गेल्या काही दिवसांत मार्केट यार्ड परिसरात वारंवार मोबाईल चोरी करून पोलिसांच्या रडारवर होता. पोलिस उपनिरीक्षक सुनील भापकर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना हवालदार दत्तात्रय राऊत यांना गुप्त माहिती मिळाली की पक्या हा फळ मार्केट गेट क्रमांक ३ जवळील सार्वजनिक शौचालयाजवळ थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पथकाला पाहून पक्या पळ काढण्याचा प्रयत्न करत होता; परंतु पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला काही अंतरावरच पकडले.

आरोपीकडून मुद्देमाल जप्त: प्रकाश परिहार याच्याकडून चार मोबाईल फोन (किंमत ₹40,000) जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात भादंवि कलम 379(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की, पक्याच्या अटकेमुळे शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा बसणार आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदलेले आहेत. पुढील तपासात त्याचे साथीदार आणि चोरीच्या मालाचा उलगडा होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोज पाटील, डीसीपी राजकुमार शिंदे, आणि एसीपी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले यांच्या आदेशानुसार पीएसआय सुनील भापकर, हवालदार राजेश थोरात, महेश जेधे, दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, नितीन झेंडे, किरण जाधव आणि अमलदार आशिष यादव यांनी सहभाग घेतला.


Notorious mobile thief ‘Pakkya’ finally nabbed – Market Yard Police’s smart trap!

Pune’s notorious mobile thief Prakash alias ‘Pakkya’ Parihar (28), wanted in multiple theft cases, was finally nabbed by Market Yard Police through a smartly planned trap. He was caught near the Fruit Market Gate No. 3 after attempting to flee. Police seized four mobile phones worth ₹40,000 from him. Pakkya has several prior cases registered across Pune. Officials believe his arrest will curb the rising trend of mobile thefts in the city and help uncover his wider network.

  • पुणे मोबाईल चोरी पकड
  • पक्या अटक मार्केट यार्ड
  • पुणे गुन्हेगारी बातमी
  • Pune Mobile Theft News
  • Market Yard Police Action
  • Notorious thief Pakkya Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours