हिरकणी मावळ महिला पतसंस्थेची द्वितीय सर्वसाधारण सभा उत्साहात पार

1 min read

Hirkani Maval Women’s Cooperative Credit Society successfully holds its 2nd Annual General Meeting

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (प्रतिनिधी): 29 Sep 2025:
हिरकणी मावळ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान अध्यक्षा सौ. मीनाक्षी तिकोणे यांनी भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सभापती ज्ञानेश्वरजी दळवी, जनता बँक व्यवस्थापक भास्कर भेगडे, पवना कृषक संस्था चेअरमन गणपत निंबळे, व्यवस्थापक प्रदीप शिंदे, तसेच सहकार तज्ञ अड. महेंद्र खरात उपस्थित होते.

मुख्य लिपिका भक्ती फडके यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर भास्कर भेगडे यांनी सहकार विषयावर मार्गदर्शन केले तर प्रमुख वक्ते अड. महेंद्र खरात यांनी “सभासदांचा सहभाग, कर्तव्ये आणि क्रियाशील सभासदांची जबाबदारी” या विषयावर सविस्तर विचार मांडले. मा. सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनीही सहकार व महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात आदर्श माता कल्पनाताई लाखे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका कु. विद्या तिकोणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालिका कु. वैष्णवी दळवी यांनी मानले.

या वेळी उपाध्यक्ष उज्वला दळवी, मिनाक्षी भेगडे, संगीता नाईकरे, मानसी गुप्ते, नंदा दाभाडे, राजश्री नाईकरे, मंगल घोडके, सुरेखा पलंगे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • महिला पतसंस्था सभा (Women’s Cooperative AGM)
  • हिरकणी मावळ महिला सहकारी संस्था (Hirkani Maval Women Cooperative)
  • सहकार चळवळ महाराष्ट्र (Cooperative Movement Maharashtra)
  • महिला सक्षमीकरण (Women Empowerment)
  • वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting)

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours