सोनम वांगचुक तुरुंगात, निलेश घायवळ परदेशात; सरकारच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्ला!

1 min read

Sonam Wangchuk jailed, Nilesh Ghaywal abroad; NCP slams government’s role

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7

Pune | 01 ऑक्ट – (प्रतिनिधी) – देशभक्त व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) तुरुंगात डांबले जात असताना, गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निलेश घायवळ मात्र लंडनमध्ये पोहोचतो, हेच महाराष्ट्र व केंद्र सरकारचे दुहेरी धोरण असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)ने केला आहे. या अराजकतेविरोधात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाची ठळक मागणी :

  • महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित चौकशी करावी
  • घायवळच्या पलायनाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • मोदी सरकारने सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी.

आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी “गुन्हेगारांना अभय, देशभक्तांना तुरुंग का?” अशा घोषणा दिल्या.

प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात उदय महाले, अनिता पवार, रमीझ सय्यद, किशोर कांबळे, हेमंत बधे, शैलेंद्र बेल्हेकर, प्रसाद कोद्रे, पप्पू घोलप, आसिफ शेख, डॉ. शशिकांत कदम, युसूफ शेख, रुपाली शेलार, नरेश पगडालु, गणेश नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



Sonam Wangchuk jailed, Nilesh Ghaywal abroad; NCP slams government’s role

The Nationalist Congress Party (Sharad Pawar faction) held a strong protest at Bal Gandharva Chowk, Pune, condemning what they called the government’s double standards: allowing hardened criminal Nilesh Ghaywal to flee to London while jailing educationist and Magsaysay awardee Sonam Wangchuk under the National Security Act. NCP leaders demanded a probe against those who facilitated Ghaywal’s escape and urged the immediate release of Wangchuk, calling the situation a “disgrace to Indian democracy.”

  • सोनम वांगचुक तुरुंग
  • निलेश घायवळ लंडन
  • राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन पुणे
  • Devendra Fadnavis resignation demand
  • Sonam Wangchuk arrest protest Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours