A First-of-its-Kind Reunion in Maharashtra — 25 Batches United in Joy and Gratitude!
Hirkani Maval Women’s Cooperative Credit Society successfully holds its 2nd Annual General Meeting


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
मावळ (प्रतिनिधी): 28 Oct 2025:
श्री बापदेव शिक्षण संस्थेच्या श्री रेणुका माध्यमिक विद्यालय, रासे येथे तब्बल २५ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. 1999 ते 2025 या काळात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येत आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. हा मेळावा केवळ खेड तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण ठरला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि प्रार्थनेनंतर कार्यक्रमाला भावनिक सुरुवात मिळाली.
या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वाळुंज (बोर्हाडे) यांच्यासह संजीव भोर, संजयकुमार पिचके, संतोष काळे, कल्पना गायकवाड, माजी शिक्षक सतिश मुंगसे, आनंदा डावरे, नाईकडे सर, दरेकर सर, रोहिदास मुंगसे, शिक्षकेत्तर कर्मचारी शारदा मुंगसे, वसंत मुंगसे, नितीन कडलक, राजेंद्र शिंदे, संदीप पाटील आदी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

“आज आम्ही जीवनात उभे आहोत, कारण आमच्या शाळेने आम्हाला पायाभूत संस्कार दिले”: अनेक वर्षांनी शाळेत भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू तरळले. राहुल आपस्तंबे, कांचन शिंदे, काजल वाडेकर, मयूर मुंगसे, अर्चना मुंगसे, डॉ. श्रुतिका डावरे, निखिल डावरे, अमृता शिंदे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेच्या संस्कारांबद्दल आणि शिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आज आम्ही जीवनात उभे आहोत, कारण आमच्या शाळेने आम्हाला पायाभूत संस्कार दिले,” असं म्हणत विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेची इमारत विस्तारावी व डिजिटल सुविधा वाढवाव्यात या उद्दिष्टासाठी योगदान देण्याचा संकल्पही व्यक्त केला.
शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत,
“तुमची प्रगती हेच आमच्या कार्याचे खरे फलित आहे,” अशा भावना मांडल्या.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, हास्यखेळ, व स्नेहभोजनाचा समावेश होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल वाडेकर व पुनम मुंगसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजीत डावरे यांनी केले.
अद्वितीय आणि राजकारणमुक्त स्नेहमेळावा! :
या स्नेहमेळाव्याची खासियत म्हणजे — हा कोणत्याही राजकीय रंगाशिवाय आयोजित करण्यात आला होता. राजकारणापेक्षा शिक्षकांप्रती आदर आणि शिक्षणसंस्कारांचा उत्सव म्हणून हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
एकूण ८०० माजी विद्यार्थी उपस्थित होते आणि १९९८–९९ पासून २०२४–२५ पर्यंतच्या तब्बल २७ बॅचेसचा सहभाग हा या सोहळ्याचा विशेष उल्लेखनीय भाग ठरला.
या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली आणि “शाळेचा स्नेहमेळावा महाराष्ट्रात आदर्श ठरावा” या हेतूने हा ऐतिहासिक क्षण साकारला.

25 Batches, 800 Alumni and One Nostalgic Reunion — The Unforgettable Alumni Meet of Shri Renuka School!
The Shri Renuka Madhyamik Vidyalaya in Rase, Khed (Pune), hosted a historic alumni meet featuring 25 batches from 1999 to 2025, with over 800 former students. The reunion celebrated gratitude, nostalgia, and the teacher-student bond, remaining entirely apolitical. Alumni pledged to support the school’s digital and infrastructure development, making the event a shining example of unity and respect for education in Maharashtra.
श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे स्नेहमेळावा,
माजी विद्यार्थी मेळावा पुणे,
Renuka Madhyamik Vidyalaya
Rase alumni meet,
Pune school reunion,
खेड तालुका शाळा कार्यक्रम,
alumni get together Maharashtra,
school reunion news
+ There are no comments
Add yours