Citizens Oppose Lohgaon Development Plan; Call It Builder-Friendly, Warn of Legal Action

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7
Pune | 28 Oct 25 – (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या अकरा गावांपैकी नऊ गावांचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) अखेर जाहीर झाला आहे. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या आराखड्यामुळे विकासाची गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, लोहगावातील नागरिकांनी या आराखड्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, आरक्षणे करताना सामान्य नागरिक व शेतकऱ्यांवर अन्याय करून, श्रीमंत बिल्डरांच्या जमिनींना वगळण्यात आले आहे.
संत तुकाराम मंदिरात ग्रामसभेचा जाहीर संताप :
रविवारी (दि. २६) लोहगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिरात नागरिकांची मोठी बैठक पार पडली.
या बैठकीत आराखड्यातील आरक्षणांवर एकमुखी विरोध नोंदवण्यात आला.
सर्वांनीच “जास्तीत जास्त हरकती दाखल करा” असे आवाहन केले, तर काहींनी न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे जाहीर केले., या वेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संतोषलाला खांदवे, माजी उपसरपंच प्रितम खांदवे, बंडू खांदवे, मिलिंद खांदवे,
संदीप मोझे आदी मान्यवरांसह जागाधारक, शेतकरी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्य नागरिकांच्या घरांवर ‘आरक्षणाचा हातोडा : लोहगावच्या डीपीमध्ये एक्झिबिशन सेंटर, खेळाचे मैदान, शाळा, हॉस्पिटल, उद्यान आणि मोठे रस्ते यासाठी आरक्षणे टाकली आहेत.
पण या आरक्षणांमुळे शेकडो पक्की घरे बाधित होत आहेत. ग्रामपंचायत काळात एक-दोन गुंठ्यांवर घर बांधून स्थायिक झालेल्या कुटुंबांना आता बेघर होण्याची वेळ येणार असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरही पूर्ण आरक्षणे पडली असून ते भूमिहीन होण्याच्या संकटात आहेत.
‘बिल्डरधार्जिणा’ आराखडा असल्याचा थेट आरोप :
लोहगावकरांचे म्हणणे आहे की, गावात आधीच कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी जमिनी देण्यात आल्या आहेत, तरी पुन्हा त्याच प्रकारच्या आरक्षणांची गरज का? सुमारे ३० एकर जागेवर एक्झिबिशन सेंटरचे आरक्षण टाकण्यात आले असून त्याची कोणतीही तातडीची आवश्यकता नाही.
“आगामी काळात उच्चभ्रूंसाठी बहुमजली प्रकल्प उभारता यावेत म्हणून हा आराखडा तयार केला गेला आहे.
बिल्डरांच्या शेकडो एकर जमिनींवर आरक्षण नाही, पण शेतकऱ्यांवर मात्र अन्याय केला गेला आहे,”
असा आरोप अशोकबापू खांदवे यांनी केला.
“आरक्षण कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि आवश्यक असल्यास न्यायालयातही लढा दिला जाईल.” असा इशारा त्यांनी दिला
हरकती दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदत : नगररचना विभागाने कळवले आहे की,
विकास आराखड्याविरुद्ध हरकती दाखल करण्यासाठी विधानभवनासमोरील प्रशासकीय इमारतीत असलेल्या नगररचना विभागाकडे अर्ज करता येतील. आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत उपलब्ध आहे.
Citizens Oppose Lohgaon Development Plan; Call It Builder-Friendly, Warn of Legal Action
Citizens of Lohgaon have strongly opposed the newly released Pune Development Plan (DP), calling it builder-friendly and discriminatory. Locals allege that while big developers’ plots have been spared, small landowners and residents face eviction due to reservations for roads, exhibition centers, and parks. A large public meeting held at Sant Tukaram Temple saw residents vowing to file maximum objections and, if needed, take the matter to court. Former Haveli Panchayat Chief Ashokbapu Khandave stated that if the DP is not revised, citizens will launch protests and seek legal redress.
- लोहगाव विकास आराखडा,
- लोहगाव DP,
- Pune Development Plan,
- Builder Dharjina DP,
- Lohgaon Nagar Rachana objections,
- अशोकबापू खांदवे,
- Lohgaon citizens protest,
- Pune DP plan 2025
+ There are no comments
Add yours