” मैं हू डॉन” म्हणत महिलेला रस्त्यात अडवून छेडछाड; ‘तथाकथित भाई’ संकेत सावंत याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा”

1 min read

Woman Harassed in Vishrantwadi; Accused Claims to Be ‘Local Don’, Police File Case Against Three

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB


विश्रांतवाडी: एके काळी सुसंस्कृत समजले जाणाऱ्या पुण्यात वाढत्या नागरीकरणा सोबतच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

नुकतीच विश्रांतवाडी – कळस एक गंभीर घटना घडली आहे, 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहित महिला विश्रांतवाडी चौकातून आपल्या नातेवाइकांकडे जात असताना कळस माळवाडी परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी अडवले.

आरोपी संकेत सावंत याने “इथे माझंच राज्य आहे, मी इथला डॉन आहे, चल माझ्यासोबत” अशी धमकी दिली. त्याच्यासोबत असलेल्या दोन तरुणांनीही “तू खूप सुंदर आहेस, आम्ही पैसे देतो, आज रात्री आमच्या सोबत चल” असे विकृत व अश्लील शब्द वापरले.

एकट्या महिलेला पाहून तिला मानसिक त्रास देऊन तिच्या आत्मसन्मानाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न त्या महिलेने अतिशय धैर्याने सहन केला आणि लगेच विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संकेत सावंत सह तिन्ही आरोपीं विरोधात विनयभंग, धमकी व सार्वजनिक ठिकाणी महिलेला त्रास देण्याचे कलम लावून गुन्हा नोंदवला आहे.


महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी:

एका सर्व्हे नुसार प्राप्त आकडेवारी नुसार

  • पुणे शहरात 2024 मध्ये विनयभंगाचे 927 गुन्हे नोंदवले गेले.
  • त्यातील 22 प्रकरणं ही सार्वजनिक ठिकाणी छेडछाड किंवा धमकी देण्याच्या स्वरूपातील होती.
  • विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या वर्षभरात अशा 7 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
  • या व्यतिरिक्त असंख्य प्रकारणा मध्ये अश्या घटनांची पोलिसात तक्रार केली जात नाही, कदाचित त्या मुळेच अश्या विकृती समाजात वाढत असताना दिसत आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केलं, मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी CCTV, गस्त, महिला सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज आहे, असा सूर आहे. स्थानिक महिला संघटनांनी या घटनेची तीव्र नोंद घेतली असून पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

English Summary :

In Vishrantwadi, Pune, a married woman was harassed by three men while on her way to visit relatives. One of the accused, Sanket Sawant, claimed to be a local don and threatened the woman, while the others made vulgar offers and comments. The woman courageously filed a police complaint, leading to a registered case of molestation. This incident highlights a troubling pattern of public harassment against women in Pune’s suburbs and underscores the urgent need for improved public safety measures and stricter law enforcement.

  • Vishrantwadi molestation case
  • Woman harassed by local goons Pune
  • Pune woman harassment
  • Sanket Sawant molestation FIR
  • Vishrantwadi police action on harassment
  • Public safety Pune women
  • Local don threatens woman Pune



You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours