पाटणमध्ये दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू ; ओझर्डे-सडवली मार्ग खंडित, वडगाव मावळात महामार्गावरील वाहतूक ठप्प


महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
(मावळ) -: 06 Jul 2026:
मावळ तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरड कोसळणे, रस्ते वाहून जाणे, गावांचा संपर्क तुटणे आणि घरांमध्ये पाणी शिरणे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
पाटण गावात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका कुटुंबाचे घर दरडीखाली आल्याने 3 जणांचा मृत्यू असून बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. प्रशासनाकडून शोध व बचावकार्य सुरू आहे.

ओझर्डे-सडवली मार्गावरील रस्ता वाहून गेला :ओझर्डे आणि सडवली मार्गावरील स्मशानभूमीजवळील रस्ता पुराच्या पाण्याने अक्षरशः वाहून गेला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोटोबा महाराज मंदिर परिसर जलमय
वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. मंदिर परिसर तसेच आसपासच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुसगाव पीएमए परिसरातील घरांमध्ये पाणी :
कुसगाव पीएमए परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत: आमदार सुनील अण्णा शेळके यांचे ग्राउंड वर उतरून प्रशासकीय यंत्रणेबरोबर मदत कार्य सुरु..
वडगाव मावळ येथे पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे.

पवना धरणात ४४ टक्के जलसाठा :
सततच्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरण सध्या ४४ टक्के भरले आहे. जलसाठा वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.


साते फाट्यावरती मुंबई पुणे हायवे वरील पावसाच्या पाण्याने वाहून गेलेला टेम्पो
पावसाचा कहर : दरड कोसळल्याने खंडाळा घाट मधील वाहन आणि रेल्वे दोन्ही मार्गाचे प्रचंड नुकसान झाल्याने मुंबई -पुणे वाहतुकीचा संपर्क तुटला आहे



+ There are no comments
Add yours