आई-बाप नसेल तर आयुष्य अपूर्ण! तरुणाईला प्रा. हंकारे यांचा अंतर्मुख करणारा संदेश

2 min read

The One Who Has Parents At Home Is The Real Millionaire – Prof. Vasant Hunkare’s Emotional Message

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7

Pune | 24 Nov 25 – (प्रतिनिधी) – “ज्याच्या घरात आई आणि बाप आहेत, तो माणूस जगातील सर्वांत श्रीमंत आहे,” असा मनाला चटका लावणारा संदेश ज्येष्ठ वक्ते प्रा. वसंत हुंकारे यांनी पुण्यात दिला. ते अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे स्वर्गीय मरिअप्पा चलवादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित खास मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचा विषय होता – “कधीही न समजणारे आईबाप : भरकटलेली तरुणाई व न समजलेले आईबाप समजून घेताना”, ज्यासाठी इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यसनमुक्त जीवन आणि निरोगी सवयींचा कानमंत्र : आजच्या पिढीत वाढत चाललेल्या व्यसनांवर बोलताना प्रा. हुंकारे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. दररोज नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध दिनक्रम हेच उज्ज्वल भवितव्याचे गुपित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईल, सोशल मीडिया आणि वाईट संगती तरुणांना आई‑बापांपासून दुरावते; यासाठी संवाद, आदर आणि कृतज्ञता ही तीन सूत्रे आयुष्यभर पाळा, असा ‘कानमंत्र’ त्यांनी दिला.

मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान सोहळा : या मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हुलगेश चलवादी, अॅड. रेणुका चलवादी (शिर्के), स्वप्निल शिर्के, प्राचार्या स्मिता लोंढे आणि व्यवस्थापिका सायली शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर डॉ. हुलगेश चलवादी आणि अॅड. रेणुका चलवादी (शिर्के) यांनी प्रा. वसंत हुंकारे यांचा महात्मा फुले पागडी, शाल, संविधानाची प्रत आणि डायरी देऊन सन्मान केला.

कुटुंब संवादासाठी टर्निंग पॉइंट:
या कार्यक्रमामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांसाठी हा दिवस टर्निंग पॉइंट ठरला.समोरासमोर मिठी मारताना, डोळ्यातून आलेले अश्रू आणि सभागृहात भरलेली शांतता – या सर्वांनी एकच संदेश दिला:आई‑बाप समजून घेण्यासाठी शिकवणीची गरज नसते, फक्त हृदय उघडण्याची गरज असते.


Life Is Incomplete Without Parents — A Heart-Touching Guiding Session for Youth

Professor Vasant Hunkare, speaking at the Annabhau Sathe Hall in Yerawada, Pune, described those who still have their mother and father at home as “the richest people in the world” during an emotional guidance session held on 19th November in memory of Mariappa Chalavadi for students of Classes 7 to 12 and their parents. Emphasising that in life there is only one God called “father” and one Goddess called “mother”, he appealed to youth to value their parents while they are alive, saying that serving them is the truest form of worship, and urged students to stay away from all addictions, exercise daily and keep their bodies healthy. In a powerful interactive moment, some fathers and their children were invited to the stage; after Hunkare described a father’s sacrifices, the children hugged their fathers tightly, bringing a deep silence over the hall and tears to many eyes. The event began with lighting a lamp and garlanding national leaders’ portraits, and chief guests Dr Hulgesh Chalavadi and Advocate Renuka Chalavadi (Shirke), along with other dignitaries, felicitated Prof. Hunkare with a Mahatma Phule turban, shawl, a copy of the Constitution and a diary in recognition of his inspiring message on understanding parents and correcting a “lost” youth.

  •  Vasant Hunkare speech, parents importance in life, Anna Bhau Sathe hall Yerwada, Mariyappa Chalavadi memorial program, youth guidance Pune

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours