मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर! दरड कोसळली, रस्ता वाहून गेला; अनेक भाग जलमय, आमदार सुनील शेळके एक्शन मोड मध्ये! नागरिकांना सतर्कतेचा इशारा

1 min read

पाटणमध्ये दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू ; ओझर्डे-सडवली मार्ग खंडित, वडगाव मावळात महामार्गावरील वाहतूक ठप्प

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

(मावळ) -: 06 Jul 2026:
मावळ तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरड कोसळणे, रस्ते वाहून जाणे, गावांचा संपर्क तुटणे आणि घरांमध्ये पाणी शिरणे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

पोटोबा महाराज मंदिर परिसर जलमय

वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. मंदिर परिसर तसेच आसपासच्या भागात पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

साते फाट्यावरती मुंबई पुणे हायवे वरील पावसाच्या पाण्याने वाहून गेलेला टेम्पो

पावसाचा कहर : दरड कोसळल्याने खंडाळा घाट मधील वाहन आणि रेल्वे दोन्ही मार्गाचे प्रचंड नुकसान झाल्याने मुंबई -पुणे वाहतुकीचा संपर्क तुटला आहे

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours