Kamshet Hit-and-Run Case: Fugitive Thar Driver Arrested, Two Dead
महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
कामशेत: पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर नायगाव गावाजवळ ५ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एक काळ्या रंगाची थार कारने दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली होती. या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर थारचा चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता. या धडकात फिर्यादी स्वप्नील अनुसारे आणि त्यांचे मित्र संतोष भानुसारे गंभीर जखमी झाले होते. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये गणेश दत्तात्रय चोपडे आणि अर्चना गणेश चोपडे (नायगाव) यांचा समावेश होता.
कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 197/2024 अंतर्गत हा अपघात नोंदवण्यात आला. तपासाच्या कार्यवाहीमध्ये कामशेत पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी सखोल तपास करून फरार आरोपीचा माग काढला. तपासाचे मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फरार चालक राहुल श्रीशैल बिराजदार (रा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) याला ताब्यात घेतले आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
या तपासात पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेडगे, उपनिरीक्षक अब्दुल शेख आणि त्यांचे सहकारी हवालदार गणेश तावरे, जितेंद्र दीक्षित, सुहास सातपुते, अमोल ननवरे, श्री गवारी, प्रतीक काळे, होमगार्ड लालगुडे आणि बोंबले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
In a hit-and-run incident on the Pune-Mumbai old highway near Naigaon, a black Thar vehicle had struck two motorcycles, killing two people on the spot and seriously injuring two others. The Kamshet police arrested the driver, Rahul Srisail Birajdar, after a thorough investigation. A case was registered under FIR No. 197/2024, and the driver was remanded in police custody for further investigation.
Kamshet hit and run accident
Pune Mumbai highway accident
Black Thar accident Pune
Kamshet Thar driver arrested
Pune hit and run October 2024
Kamshet accident case update
Pune road accident news
Thar driver arrested after hit and run
+ There are no comments
Add yours