वडगावशेरी: जगदीश मुळीक आणि सुनील टिंगरे यांची ऐतिहासिक एकजूट; महायुतीचाच विजय! केला विश्वास व्यक्त

1 min read

Historic Alliance Between Jagdish Mulik and Sunil Tingre; Confidence in Mahayuti’s Victory

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

आता आमचं ठरलय! टिंगरे यांच्या विजयासाठी मुळीक मैदानात! महायुती तर्फे जोरदार मोर्चे बांधणी

वडगावशेरी: आमदार सुनील टिंगरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे, भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांसह सुनील टिंगरे प्रचारात सक्रिय झाल्याने वडगावशेरी मध्ये टिंगरे – मुळीक यांची ऐतिहासिक एकजूट दिसून आली, ज्या मुळे महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला दिसून आला.

काल 5 नोव्हेंबर रोजी, आमदार सुनील टिंगरे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ धानोरी गाव येथील ग्रामदेवत भैरवनाथ महाराज मंदिर येथे नारळ वाढवून केला.

या वेळी महायुतीचे घटक पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थीत होते.

महाराष्ट्राचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानपरिषदेच्या आश्वासना नंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या साठी आपली संपूर्ण ताकत लावून मैदानात उतरल्याचे दिसून आले.

या वेळी जगदीश मुळीक म्हणाले की, आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आणि पक्षाचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत महायुती म्हणून आम्ही राज्यात समाजातील सर्वच घटकांसाठी चांगली कामगीरी केली आहे, आणि महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही सर्व मित्र पक्ष एकजुटीने या निवडणुकीस सामोरे जात आहोत,

मागील 10 वर्षात वडगावशेरी मतदार संघात मी आणि टिंगरे यांनी केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावर जनता सुनील टिंगरे यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून देईल आणि मी देखील लवकरच विधानपरिषेदेत तुम्हाला दिसेल अश्या प्रकारे वडगावशेरी मधून दोन आमदार महायुतीचे असतील असा विश्र्वास या वेळीं जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

या प्रचार शुभारंभ सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ), भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) यांचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, आणि हजारो कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते. महायुतीच्या या एकजुटीमुळे प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

  • English:
    Vadgaon Sheri elections
  • Mahayuti alliance
  • Jagdish Mulik support, Sunil Tingre
  • Mahayuti victory
  • Maharashtra Assembly Election 2024 BJP and NCP alliance
  • historic unity
  • Pune election news

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours